गुजरात राज्याच्या बडोदा जिल्हय़ात मनाला चटका लावणारी एक घटना घडली आहे. कोरोनाबाधित एका रुग्णाचे शुक्राणू त्याच्या पत्नीच्या सांगण्यावरून एका खासगी रुग्णालयाने संग्रहित केले. त्यानंतर त्वरित त्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीच्या पत्नीने त्याला कोरोना झाल्यानंतर त्याचे शुक्राणू संग्रहित करावेत, अशी मागणी केली होती. यासाठी तिने गुजरात उच्च न्यायालयात याचिकाही सादर केली होती. आपल्या पतीच्या शुक्राणूंमुळे आपल्याला कृत्रिम गर्भधारणा करता येईल. त्यामुळे पतीचा वंश सुरू राहील, अशी तिची भावना आहे. तिच्या भावनेचा मान ठेवून गुजरात उच्च न्यायालयाने तसा आदेश दिला होता.
ही पत्नी कॅनडामध्ये वास्तव्यास आहे. गुजरातमध्ये असणाऱया तिची पतीची स्थिती कोरोनामुळे गंभीर झाली होती. तो जिवंत राहण्याची शक्मयता जवळपास नव्हती. तथापि, त्याच्यापासूनच आपल्याला मूल व्हावे, असे पत्नीला वाटत होते. त्यामुळे तिने शुक्राणू संग्रहित करण्याचा अनोखा मार्ग निवडला. न्यायालयानेही त्याला संमती दिल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पतीचे शुक्राणू संग्रहित करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्वरितच पतीचा मृत्यू झाला. अशा प्रकारची ही भारतातील पहिलीच घटना असावी, अशी चर्चा आहे.