वेंगुर्ले / वार्ताहर:
महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धेत वेंगुर्ले येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या कु. सानिया सुदेश आंगचेकर हिने १८ वर्षाखालील मुलींच्या गटातून ४०० पैकी ३५७ गुण प्राप्त केले आहेत. ऑक्टोबरमध्ये गुजरात (अहमदाबाद) येथे होणाऱ्या प्रि नॅशनलसाठी तिची निवड झाली आहे.
सानिया आंगचेकर हिच्या यशाबद्दल संस्था उपाध्यक्ष ईर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सेक्रेटरी दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.