उगारखुर्द, कागवाड, शेडबाळ, ऐनापूरला होणार लाभ : आमदार श्रीमंत पाटील यांची माहिती
वार्ताहर / उगारखुर्द
जगातील प्रगत राष्ट्र असलेल्या जर्मन तसेच इस्त्राईल देशांप्रमाणे कागवाड मतदारसंघातील कागवाड, शेडबाळ, ऐनापूर, उगार खुर्द या शहरातील नागरिकांना कायमस्वरूपी शुद्ध पाणी पुरवठा करण्याकरिता 130 कोटी रुपयांच्या निधी योजनेचा आराखडा बनवला आहे. यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी त्याला प्राथमिक स्वरुपात मान्यताही दिली आहे. लवकरच सदर योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री तसेच कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली.
उगारखुर्द येथे नगर परिषदेच्या 14 व 15 व्या वित्त आयोगातून 3.15 कोटी रुपये खर्चातून शुद्ध पाणी पुरवठा, रस्ते डांबरीकरण, गटारी निर्माण करणे अशा विविध कामांच्या शुभारंभप्रसंगी आमदार श्रीमंत पाटील बोलत होते. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित
होते.
उगारखुर्दसाठी पाणी योजना
उगारखुर्द हे 25000 लोकसंख्या असलेले कागवाड तालुक्मयातील शहर आहे. येथील नागरिकांची आजपर्यंत कृष्णा नदीतून पंपसेटद्वारे खेचलेल्या पाण्याच्या माध्यमातून तहान भागविली जात होती. दरम्यान अशुद्ध पाणी पुरवठय़ामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. त्याकरिता शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरिता एक नवी योजना उभारण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रफुल थोरूसे, सुभाष कुराडे, सुजय फराकटे, प्रताप जत्राटे, राजू पाटील, मुख्याधिकारी संतोष बबलादी, ठेकेदार एम. जी. नदाफ, विकास पांढरे, साई पाटील, सचिन साळुंखेसह कार्यकर्ते उपस्थित होते.