उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून विविध अटींवर जामीन मंजूर, खडेबाजार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हय़ातही सर्वांना जामीन
प्रतिनिधी / बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचा अवमान झाल्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे तरुणांनी निषेध नोंदविला होता. त्यानंतर तरुणांवर मार्केट पोलीस स्थानकांमध्ये राजद्रोह आणि 307 सारखा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी येथील आठवे जिल्हासत्र न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र येथील न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्या ठिकाणी खंडपीठाने अटक केलेल्या दोघांना तर अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केलेल्या एकाला विविध अटींवर जामीन मंजूर केला आहे.
शुभम शेळके, अंकुश केसरकर या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे तर ऍड. अमर येळ्ळूरकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. उच्च न्यायालयाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती मोहम्मद नवाज यांनी हा जामीन अर्ज मंजूर केला आहे. इतर तरुणांच्या अर्जावर त्या ठिकाणी सोमवार 24 रोजी सुनावणी होणार आहे.
मार्केट पोलिसांनी दाखल केलेल्या राजद्रोह व खुनी हल्लासारख्या गुन्हय़ांतून या सर्वांना जामीन मंजूर करताना 2 लाख रुपयांचे हमीपत्र आणि तितक्मयाच रकमेचे दोन जामीनदार, पोलिसांना सहकार्य करणे, पुन्हा असा गुन्हा करु नये, प्रत्येक तारखेला हजर राहणे या अटेंवर हा जामीन मंजूर केला आहे. या सर्वांच्यावतीने ऍड. डॉ. विजय हिरेमठ, ऍड. दीपक कुलकर्णी, ऍड. महेश बिर्जे, ऍड. राम घोरपडे, ऍड. निरेंद्र गुंडे यांनी काम पाहिले आहे.
खडेबाजार पोलीस स्थानकातील गुन्हा प्रकरणीही जामीन मंजूर
निष्पाप तरुणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
अटकेतील 38 जणांनी जामीनासाठी तर इतर 23 जणांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायालयाने या सर्वांनाच जामीन मंजूर केला आहे.
खडेबाजार पोलिसांनी गुन्हा क्रमांक 88 व 91 यामध्ये या प्रकरणी आठवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्या गुन्हय़ामध्ये अटक केलेल्यांना व अटकपूर्व जामीन मागितलेल्या तरुणांना जामीन मंजूर केल्याने दिलासा मिळाला आहे. खडेबाजार पोलिसांनी शुभम शेळके, रमाकांत कोंडुसकर, अंकुश केसरकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक सुतार, सुनील लोहार, नागेश काशिलकर, रोहित माळगी, विनायक सुतार, गजानन जाधव, विनायक उर्फ मायाप्पा कोकितकर, दयानंद बडसकर, सुरज गायकवाड, राहुल बराळे, महेश मुतगेकर, राहुल सावंत, सिद्धू उर्फ श्रीधर गेंजी, गणेश येळ्ळूरकर, विक्की मंडोळकर, भालचंद्र बडसकर, विनायक हुलजी, राजा गुरव, बागेश नंद्याळकर, अभिषेक पुजारी, राजेंद्र बैलूर, श्रेयश खटावकर, शशिकांत अरकेरी, नागेश काशिलकर, सुरज शिंदोळकर, बळवंत शिंदोळकर, रोहित माळगी, हरिष मुतगेकर, लोकनाथ राजपूत, भरत मेणसे यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्या सर्वांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
पोलिसांनी या सर्वांवर भा.दं.वि. 147, 148, 353, 332, 153, 336, 427, 435, 109, 504, 506 सहकलम 149 सेक्शन 2 ए केपीडीपी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. या सर्वांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होवून 1 लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, तितक्मयाच रकमेचे दोन जामीनदार, विजयोत्सव यात्रेमध्ये भाग घेवू नये, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करु नये या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या खटल्यामध्ये ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. शंकर बाळनाईक हे काम पाहत आहेत.