क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठ नेटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विद्यापीठाच्या संघात स्थान मिळविलेल्या शुभम यादवला विद्यापीठातर्फे युनिव्हर्सिटी ब्ल्यू बहुमान बहाल करण्यात आला. तामिळनाडू येथे होणाऱया आंतरविद्यापीठ नेटबॉल स्पर्धेसाठी शुभम रवाना होणार आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठ आयोजित नेटबॉल स्पर्धेत गोगटे महाविद्यालयाच्या शुभम यादवने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याची दखल घेऊन विद्यापीठ निवड समितीने संघात निवड केली आणि युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताब बहाल केला. त्याबद्दल गोगटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एच. मिरापूर, जिमखाना चेअरमन डॉ. दत्ता कामकर, डॉ. एम.एल. लमानी, बाबूराव शेळके, क्रीडा प्राध्यापक मंजुनाथ गौडा, नम्रता अंतिलमरद यांच्या हस्ते शुभम यादवचा खास गौरव करण्यात आला.