प्रतिनिधी/ बेळगाव
देशावर कोरोनाचे संकट ओढवले असून हे संकट थोपविण्यासाठी समाजातील विविध स्तरांतून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. बुधवारी गणेशपूर मेन रोड, लक्ष्मीटेक येथील शुभम लाड यांनी 1 लाख रुपयांची मदत जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केली.
एक लाखापैकी 50 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री रिलीफ फंडाच्या नावाने तर 50 हजार रुपयांचा धनादेश पंतप्रधान रिलीफ फंडाच्या नावाने दिला आहे.