शिवस्मारक येथे शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक
वार्ताहर /किणये
सावगाव येथे शिवस्मारक सेवा समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थ यांच्यावतीने सुंदर शिवस्मारक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. या ठिकाणी शिवरायांची नित्यपूजा केली जाते. शुभम शेळके व अंकुश केसरकर यांनी रविवारी सावगाव गावाला भेट देऊन शिवरायांची पूजा केली.
प्रारंभी गावातील 2011-12 सालामधील वर्गमित्र-मैत्रिणी यांनी सूर्योदयाला छत्रपती शिवाजी महाराज व महालक्ष्मी देवीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. शिवस्मारक सेवा समितीच्यावतीने अंकुश केसरकर व शुभम शळके यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शुभम शेळके व अंकुश केसरकर यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांसह इतर कार्यकर्त्यांची भाषणे झाली. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी शिवस्मारक सेवा समितीचे कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.