दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा आरोप : खडेबाजार-माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा
प्रतिनिधी / बेळगाव
काही कन्नड कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिवसेनेच्या वाहनावरही हल्ला केला. त्यावेळी शुभम शेळके यांनी मराठी भाषिक गप्प बसणार नाहीत. लाल-पिवळा कपडा गळय़ात घालणाऱयांना मराठी भाषिक हिसका दाखवतील, असा इशारा दिला होता. त्यानंतर शुभम शेळके यांच्यावर खडेबाजार आणि माळमारुती पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. शुभम शेळके हे न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये भा.दं.वि. 153ए, 505(2) आणि 506 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. माळमारुती पोलीस स्थानकामध्ये बाळू इराप्पा जडगी (रा. कणबर्गी) याने फिर्याद दिली. माळमारुती पोलीस स्थानकामध्ये पोलिसांनी शुभम शेळके यांच्यावर भा.दं.वि. 153ए, 505(2) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ऍड. नागेश सातेरी, ऍड. महेश बिर्जे,
ऍड. शंकर पाटील यांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला. खडेबाजार पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्यासाठी त्यांनी तिसरे जेएमएफसी न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने 25 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्मयाच रकमेचा जामीनदार या अटींवर जामीन मंजूर केला. माळमारुती पोलीस स्थानकामध्ये दाखल केलेल्या गुह्याप्रकरणी दुसरे जेएमएफसी न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला. त्या ठिकाणी 50 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.