महिला आघाडीच्या बैठकीत मराठी आवाज दिल्लीत पोहोचविण्याचा निर्धार
प्रतिनिधी / बेळगाव
या ना त्या कारणाने मराठी भाषिकांवर अन्याय केला जातो. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना मोठय़ा मताधिक्मयाने निवडून देऊन मराठी आवाज दिल्लीत पोहोचविणार असा निर्धार म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने करण्यात आला.
महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी शनिवारखूट येथे पार पडली. यावेळी महिला आघाडीच्यावतीने समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर होत्या.
ताकद दाखवून देण्याची हीच वेळ
माजी महापौर सरिता पाटील यांनी प्रास्ताविक करून मराठी भाषिकांवर होणाऱया अन्यायाची माहिती दिली. मागील काही दिवसात बेळगाव परिसरात घडलेल्या घटनांमुळे मराठी भाषिकांची गळचेपी केली जात आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी आपली ताकद दाखवून देण्याची ही वेळ आहे. त्यामुळे म. ए. समितीच्या उमेदवाराला अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. रेणू किल्लेकर यांनी सिंह चिन्हासमोरील बटन दाबून मराठी अस्मिता दाखवून देण्याची विनंती केली.
यावेळी महिला आघाडीच्यावतीने शुभम शेळके यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला समितीचे कार्यकर्ते मदन बामणे, प्रिया कुडची, अर्चना कावळे, श्रद्धा मंडोळकर, आशा सुपली, अनुपमा कोकणे, दीपा मुचंडी, भाग्यश्री जाधव, राजश्री बांबुळकर, माला जाधव, शालिनी पाटील, प्रभावती सांबरेकर, मंजुश्री कोलेकर, मेघा किल्लेकर, वैशाली पाटील, अनुसया परीट, कांचन यळ्ळूरकर, सुजाता बामुचे यांच्यासह महिला सदस्या उपस्थित होत्या.
वडगावमधून शुभम शेळके यांना मताधिक्य देणार : वडगाव विभाग समितीच्या बैठकीत निर्धार
मध्यवर्ती म. ए. समितीने शुभम शेळके यांना लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी दिल्याने सीमावासीयांच्या मनात नवचैतन्य पसरले आहे. म. ए. समितीचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱया वडगाव परिसरातून शुभम शेळके यांनाच सर्वाधिक मताधिक्मय देण्याचा एकमताने निर्धार वडगाव विभाग म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी कारभार गल्ली वडगाव येथील नरवीर व्यायामशाळा येथे गल्लीमधील ज्ये÷ पंच, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नगरसेवक यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत शुभम शेळके यांच्यासाठी सर्व मराठी भाषिकांनी भगव्या झेंडय़ाखाली एकत्रित येण्याचे आवाहन यावेळी पंच मंडळींनी केले. सिंह या चिन्हामुळे म. ए. समितीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याने शुभम शेळके यांनाच विजयी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, ऍड. रतन मासेकर, एपीएमसी अध्यक्ष महेश जुवेकर, अमोल देसाई, शंकर चौगुले, यल्लाप्पा नागोजीचे, विनायक माळवी, दत्ता निट्टूरकर, आनंदा माळवी, बाळकृष्ण माळवी, फकिरा कुंडेकर, उमेश पवार, सुभाष आपटेकर, दिलीप नाईक, देवकुमार बिर्जे, भाऊराव पाटील, राजू सप्रे यांच्यासह मोठय़ा संख्येने नागरिक व म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.