प्रतिनिधी/ बेळगाव
तब्बल 800 कि. मी. सायकलप्रवास करण्यासाठी भरतेश पॉलिटेक्निकचा विद्यार्थी शुभम साखे रविवारी सकाळी मार्गस्थ झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तो सायकलवरून बेळगाव ते बेंगळूर व तेथून अनंतपूरम असा प्रवास करणार आहे.
रविवारी बसवेश्वर सर्कल येथून त्याच्या या प्रवासाला सुरुवात झाली. तो हुबळी, हावेरी, दावणगेरी, चित्रदुर्ग, तुमकूर, बेंगळूर, धर्मावरम शेवटी अनंतपूरम असा प्रवास करणार आहे. या प्रवासादरम्यान स्वस्थ भारत, सुदृढ भारत या विषयीची जागृती करणार आहे.
त्याला शुभेच्छा देण्यासाठी ऍड. कलमकिशोर जोशी, राजू मालवदे, अजित शेरेगार, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.