बेंगळूर
आयटी क्षेत्रात कार्यरत असणारी प्रसिद्ध कंपनी विप्रोकडून नुकतीच चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ) पदी शुभा तातावर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुभा या मुळच्या सॅनफ्रान्सीस्को येथील असून यापूर्वी त्यांनी वॉलमार्ट आणि पेपाल या कंपन्यांवर कार्यकारी म्हणून सेवा बजावली आहे. अमेरिकेतील व्यवहारासाठी सध्या त्या तंत्रज्ञान प्रणालीवर वरिष्ठ संचालक म्हणून सेवा बजावत होत्या. पेपालमध्ये उत्पादन, डाटा प्लॅटफॉर्म आणि पायाभूत सुविधा विभागाच्या मुख्य म्हणूनही त्यांनी सेवा बजावली होती.