कोलकाता
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आमदार आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रचारादरम्यान अनेकदा विरोधाला तोंड द्यावे लागले होते. केंद्र सरकारने अधिकारी यांची सुरक्षा वाढविली आहे. आता त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. यापूर्वी अधिकारी यांच्यासोबत सुरक्षा कर्मचाऱ्यांची 4 वाहने असायची. या वाहनांच्या संख्येत आता दोनने वाढ करण्यात आली आहे. आता अधिकारी यांच्यासोबत एकूण 6 वाहनांमध्ये सुरक्षा कर्मचारी असणार आहेत. याचबरोबर त्यांच्यासोबत 6 अतिरिक्त केंद्रीय सुरक्षा जवान असतील. राज्य सरकार पोलिसांना निर्देश देत आपल्याला प्रचारापासून रोखत असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला होता.