हीमुद्रा कानांची दुखणी बरी करण्यासाठी उपयुक्त आहे.
ही मुद्रा करण्यासाठी मधलं बोट अंगठय़ाच्या गादीवर (फुगीर भागावर) ठेवून अंगठय़ानं वरून थोडासा दाब द्यावा. मधलं बोट आकाशतत्त्वाचं ते अग्नितत्त्वाच्या अंगठय़ानं दाबल्यानं शरीरातल्या आकाशतत्त्वाचे काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
1) कान वाहणे, बहिरेपणा (जन्मजात नसलेला), चक्कर येणे, कमी ऐकू येणे इत्यादी तक्रारींवर रोज 15 ते 45 मिनिटांपर्यंत करावी.
2) बहिरेपणामुळे ज्यांना बोलता येतं नाही अशा मूक-बधिरांनी ही मुद्रा केल्यास फायदेशीर ठरते.