सेन्सेक्स 223 अंकांनी तर निफ्टी 90 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आवडय़ातील शेअर बाजाराचा तेजीचा प्रवास तिसऱया दिवशीही कायम राखत बाजार शुक्रवारी बंद झाला. जागतिक पातळीवरील कमजोर वातावरणाचा काहीसा प्रभाव राहिल्याने मुंबई शेअर बाजारातील प्रमुख कंपन्यांमध्ये एचडीएफसी, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीत राहिले होते. यामुळे आठवडय़ातील शेवटचा दिवसही तेजीच्या कामगिरीने बंद झाला आहे.
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेक्समध्ये 656.72 अंकांची चढउतार राहिल्याचे दिसून आले परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 223.51 अंकांनी वधारुन निर्देशांक 32,424.10 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 90.20 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,580.30 वर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांपैकी सेन्सेक्समधील ओएनजीसीचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्मयांनी वधारले तर सोबत बजाज ऑटो, आयटीसी, सन फार्मा, नेस्ले इंडिया, लार्सन ऍण्ड टुब्रो, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे समभाग नफ्यात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये इन्फोसिस, ऍक्सिस बँक, भारती एअरटेल, टीसीएस आणि टायटन यांच्या समभागात घसरण झाली आहे.
समभागामधील खरेदी विक्रीमधील व्यवहाराव्यतिरिक्त विदेशी गुंतवणूकदारांच्याबाबतचा विश्वास देशातील गुंतवणूकदारांच्या नजरेत मजबूत झाला आहे. यामुळे शेअर बाजारामधील अस्थिर आकडय़ाच्या आधारे विदेशी पोर्टफोलियोच्या गुंतवणूकदारांचा निक्वळ नफा 2,354.14 कोटी रुपयांच्या समभाग खरेदीतून झाला असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे.
देशातील कोविड19 च्या रुग्णाची संख्या आतापर्यंत 7,466 ने वाढली आहे. यामुळे देशातील शेअर बाजारांमध्ये मोठय़ा प्रमाणात चढउताराचे वातावरण पहावयास मिळाले होते. हेच वातावरण जगभरातील देशांमध्ये असल्याने शेअरबाजारात गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे ढग दिसून येत आहेत.