प्रतिनिधी/ सातारा
शेअर मार्केट मध्ये गुतंवणूक करा, चांगले पैसे मिळवून देते असे अमिष दाखवून एका महिलेने तिघांची फसवणूक केली आहे. लाखो रूपये भरून कमी रक्कमेचा एकदाच परतावा देऊन परत पैसे दिले नाहीत. यामुळे या महिलेविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शकुंतला अरूण गायकवाड(रा. सदरबझार सातारा) असे महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युनुस बालेखान पठाण(वय 40, रा. आदर्की ता फलटण) यांना शकुंतला गायकवाड यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा चांगले पैसे मिळतील. असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. युनुस यांनी 1 लाख 12 हजार 999 रूपये ट्रॉन्फर केले. या पैशावर त्यांना 8 हजार रूपये परतावा दिला. युनुस यांनी यांची माहिती चुलत भाऊ नौशाद निसार पठाण यांना दिली. नौशाद यांनी 84 हजार 500 रूपये गुतंवले आणि त्यांना 8 हजार रूपये परतावा दिला. युनुस यांचे मित्र जावेद आब्बास आतार यांनी ही 56 हजार रूपये गुंतवले होते. त्यांना 4 हजार रूपये परतावा दिला. यानंतर एकाही परताना मिळाला नसल्याने युनुस यांनी शकुंतला यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडाउडवीची उत्तरे दिली. या तिघांनी शकुंतला यांच्याविरूद्ध ऑनलाईन तक्रार दाखल केल्यावर तिने 3 लाख 10 हजार रूपयांचा चेक दिला. हा चेक अकाऊंटमध्ये पैसे नसल्याने परत आला. यामुळे 2 लाख 34 हजार 498 रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शकुंतला यांच्याविरूद्ध युनुस यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार जगदाळे करत आहेत.