मुंबई/प्रतिनिधी
विक्रमी वाढीसह पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज झाली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार गेला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने टप्पा गाठला. सेन्सेक्ससोबत निफ्टीतही वाढ झाली आहे. निफ्टीमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी वाढ झली आहे.
भारतीय शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार गेला होता. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ५७ हजारांचा पल्ला गाठला आहे. महिन्याभरात सेन्सेक्समध्ये ४ हजार अंकांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात असाच उत्साह दिसला तर ऑक्टोबरपूर्वी सेन्सेक्स ६० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेअर बाजारातील वाढत्या गुंतवणुकीमुळे सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेन्सेक्ससोबत निफ्टीतही वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी १७ हजारापर्यंत पोहोचला होता. निफ्टीची आतापर्यंत सर्वात मोठी वाढ आहे.