सेन्सेक्स 740 तर निफ्टी 224 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ात भारतीय शेअर बाजारात घसरणीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पहावयास मिळत आहे. आठवडय़ातील चौथ्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक यांच्या समभागातील घसरणीमुळे बीएसई सेन्सेक्स 740 अंकांनी घसरणीसह बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींचा प्रभाव बाजारावर राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 740.19 अंकांनी म्हणजे 1.51 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक 48,440.12 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 224.50 अंकांनी म्हणजे 1.54 टक्क्यांच्या नुकसानीसह निर्देशांक 14,324.90 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी मारुती सुझुकीचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबत हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला मात्र डॉ. रेड्डीज लॅब, आयसीआयसीआय बँक, लार्सन ऍण्ड टुब्रो आणि एचडीएफसीचे समभाग लाभासह बंद झाले आहेत.
गुरूवारी शेअर बाजारात चढउताराचे वातावरण निर्माण झाले होते. बीएसईचे बाजारातील भांडवल 3 फेब्रुवारी 2021 नंतर प्रथमच 20,00,00 कोटी रुपयांनी खाली आले आहे. मागील दोन दिवसामध्ये बाजारातील भांडवल 5,000 कोटी रुपयापेक्षा अधिकने घटले आहे. जागतिक पातळीवरील आशियातील बाजारांपैकी चीनचा शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग घसरणीत राहिला असून जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी मात्र नफा कमाईत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
अन्य घडामोडींचा प्रभाव
आशियातील शेअर बाजारात गुरुवारी मिश्र संकेत मिळाल्याने देशातील बाजार सलग तिसऱया दिवशी घसरणीत राहिले आहेत.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- डॉ. रेड्डीज लॅब 4383
- आयसीआयसीआय 571
- एचडीएफसी . 2472
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1371
- टाटा स्टील…… 722
- सेल……………… 72
- एबीबी इंडिया 1394
- एलआयसी हाऊसिंग 412
- सिमेन्स……… 1807
- जेएसडब्लू स्टील 438
- नाटको फार्मा… 816
- एबी कॅपिटल…. 118
- कॅस्ट्रोल……….. 123
- ऑईल इंडिया… 117
समभाग घसरलेल्या कंपन्या
- मारुती सुझुकी 6786
- हिंदुस्थान युनि 2237
- भारती एअरटेल 508
- बजाज ऑटो… 3501
- एनटीपीसी…… 103
- बजाज फायनान्स 5121
- अल्ट्राटेक सिमेंट 6670
- ओएनजीसी….. 101
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1992
- टायटन……… 1450
- टेक महिंद्रा…… 970
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 792
- आयटीसी…….. 211
- पॉवरग्रिड कॉर्प. 216
- एचसीएल टेक.. 957
- एशियन पेन्ट्स 2401
- टीसीएस……. 3068
- नेस्ले……….. 16173
- ऍक्सिस बँक….. 694
- बजाज फिनसर्व्ह 9060
- इन्फोसिस….. 1333
- स्टेट बँक………. 355
- सन फार्मा……. 577
- एचडीएफसी बँक 1464
- कोटक महिंद्रा. 1763
- अपोलो हॉस्पिटल 2795
- ग्लेनमार्क 443