धातू, औषधासह सार्वजनिक बँकींग क्षेत्रात विक्रीचा प्रभाव
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील शेअर बाजारात सलग तिसऱया दिवशी बुधवारीही घसरणीचे सत्र राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसभरातील कामगिरीनंतर 65.66 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,668.42 वर बंद झाला आहे. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21.80 अंकांसह 11,131.85 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख क्षेत्रातील कामगिरीमध्ये बुधवारी धातू, औषध आणि सार्वजनिक बँकांमधील समभाग विक्रीतील तेजीमुळे बाजारात घसरण राहिल्याची नोंद केली आहे. प्रारंभीच्या काळात सेन्सेक्स 390.86 अंकांनी वधारला होता तसेच निफ्टीनेही आपला प्रवास 105 तेजीसोबत केला होता.
एसपी समूह आणि टाटा समूहामधील येत असलेल्या बातम्यांच्या प्रभावाने टीसीएसचे समभाग दोन टक्के आणि टाटा स्टीलचे समभाग 3 टक्क्मयांनी घसरले आहेत. या व्यतिरिक्त झी एंटरटेन्मेंटचे समभाग 3 टक्क्मयांच्या खाली बंद झालेत. दुसऱया बाजूला ऍक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचे समभाग 2 आणि 1 टक्क्मयांनी वधारत बंद झाले आहेत. वधारलेल्या कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक 2.43, कोल इंडिया 2.38, गेल 1.72, एचडीएफसी बँक 1.31 आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग 1.27 टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती इन्फ्राटेल 8.26, भारती एअरटेल 8016, टाटा स्टील 3.47, इंडसइंड बँक 2.95 टक्क्मयांनी घसरुन बंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
कंपन्यांची उलाढाल शेअर बाजारातील जवळपास 2,796 कंपन्यांच्या समभागांचे टेडिंग झाले असून यात 1,216 कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले होते. तर 1,418 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. सदर कंपन्यांमध्ये 98 कंपन्यांचे समभाग 1 वर्षाच्या उच्चांकावर राहणार आहेत. जागतिक बाजारातील संकेतामुळे गेले दोन दिवस मोठय़ा प्रमाणात समभाग विक्री झाली आहे. येत्या दोन दिवसात शेअर बाजाराचा प्रवास कसा असेल हे पाहावे लागेल.