ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आज आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८७०.५१ अंशांनी घसरून ४९१५९.३२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२९.५५ अंशांनी घसरून १४६३७.८० अंशांवर स्थिरावला.
जागतिक बाजारातील स्थिती
अमेरिकेचा डाऊ जोन्स इंडेक्स १७१ अंकांसह ३३,१५३ वर बंद झाला. नॅसडॅकचा निर्देशांक २३३ अंकांनी वाढून १३,४८० वर बंद झाला. जपानचा निक्केई निर्देशांक ३०,१२१, २६७ अंकांवर व्यवहार करत आहे. कोरियाच्या कोस्पी निर्देशांकात चार ची किंचित घसरण झाली आहे, तर निर्देशांक ३,१०९ वर व्यवहार करत आहे. ईस्टरमुळे ऑस्ट्रेलियाचे शेअर बाजार सोमवारी बंद आहेत. चीन आणि हाँगकाँगचे शेअर बाजार टॉम्ब स्वीपिंगमुळे बंद आहेत.