सेन्सेक्स 164 अंकांनी प्रभावीत : इन्फोसिस नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील घसरणीचा प्रवास गुरुवारी चौथ्या सत्रातही कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 164 अंकांनी घसरला आहे. आशियातील बाजारांमध्ये नकारात्मक वातावरण राहिल्याने याचदरम्यान बाजारात एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात घसरणीचे सत्र राहिल्याने बाजार प्रभावीत राहिला होता.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 164.11 अकांनी घसरुन निर्देशांक 52,318.60 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 41.50 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 15,680.00 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फिनसर्व्हचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच इन्फोसिस, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट आणि इंडसइंड बँक यांचे समभागही घसरणीत राहिले आहेत. दुसरीकडे डॉ.रेड्डीज लॅब, बजाज ऑटो, सन फार्मा, एशियन पेन्ट्स आणि एनटीपीसीसह अन्य कंपन्यांचे समभाग नफ्यात राहिले आहेत.
जागतिक बाजारात शांघाय, सोल आणि टोकीओ हे नुकसानीत राहिले. तर युरोपातील प्रमुख बाजार सुरुवातीला तेजीत राहिले. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय कच्चे तेल 0.90 टक्क्यांनी वाढून 75.29 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
नफा वसुलीचा प्रभाव
देशातील भांडवली बाजारात गुरुवारच्या सत्रात प्रामुख्याने वाहन, दैनंदिन वापरातील साहित्याची निर्मिती करणाऱया कंपन्या आणि औषध कंपन्यांच्या कामगिरीत तेजीचा माहोल राहिला होता. पण दुसरीकडे मात्र आर्थिक आणि आयटी क्षेत्रातील समभागातील नफावसुलीने बाजारातील वातावरण नकारात्मक केले आहे. जागतिक बाजारातही नकारात्मक कल राहिल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचे पहावयास मिळाले आहे. एकंदर गुरूवारीही घसरणीचा अनुभव बाजाराने घेतला.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- डॉ.रेड्डीज लॅब. 5559
- बजाज ऑटो… 4205
- सन फार्मा……. 684
- एशियन पेन्ट्स 3023
- मारुती सुझुकी 7590
- एनटीपीसी…… 117
- टायटन……… 1741
- कोटक महिंद्रा. 1715
- स्टेट बँक………. 420
- हिंदुस्थान युनि 2475
- एचसीएल टेक.. 985
- आयटीसी…….. 203
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 779
- डाबर इंडिया… 590
- गेल……………. 153
- गोदरेज……….. 888
- हिंडाल्को……… 379
- अपोलो हॉस्पिटल 3679
- कोलगेट…….. 1707
- मदरसन सुमी… 244
- ज्युबिलंट फूड. 3114
समभाग घसरलेल्या कंपन्या
- बजाज फिनसर्व्ह 11813
- इन्फोसिस….. 1560
- अल्ट्राटेक सिमेंट 6707
- टेक महिंद्रा…. 1084
- इंडसइंड बँक.. 1007
- बजाज फायनान्स 5967
- एचडीएफसी बँक 1486
- पॉवरग्रिड कॉर्प. 230
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2097
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1492
- एचडीएफसी.. 2460
- भारती एअरटेल 522
- टाटा स्टील…. 1163
- ऍक्सिस बँक….. 746
- नेस्ले……….. 17641
- टीसीएस……. 3341
- आयसीआयसीआय 630
- रिलायन्स इन्फ्रा.. 83
- कॉन्टिनिअर कॉर्प 687
- ब्रिटानिया….. 3593
- बंधन बँक 326