वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संकटात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक करण्याचा मार्ग स्विकारत असताना दिसत आहेत. यामध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीपाठोपाठ आता म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे दिसून आले आहे. म्युच्युअल फंड उद्योगाने मे महिन्यात 6.12 लाख गुंतवणूक खाती जोडली आहेत. सोबत या खात्यांची संख्या वाढून 9.1 कोटीच्या घरात पोहोचली आहे. या अगोदरच्या महिन्यात एप्रिलमध्ये 6.82 लाख खाती जोडली होती.
म्युच्युअल फंड असोसिएशनच्या आकडेवारीनुसार मेच्या शेवटपर्यंत 44 फंड हाऊसने फोलियेंची संख्या वधारुन 9,10,41,392 झाली आहे. जी एप्रिलमध्ये 9,04,28,589 होती. एप्रिलच्या तुलनेत हा टक्का 6.12 टक्क्मयापेक्षा अधिक आहे. म्युच्युअल फंडामध्ये मे महिन्यात मासिक आधारावर गुंतवणुकीच्या प्रवाहामध्ये 46 टक्के वाढ झाली असून ही वाढ 63,665 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.
मेमधील गुंतवणुकीचा प्रभाव
बाँडच्या मदतीने जोडण्यात आलेल्या योजनांमध्ये फोलियोची संख्या 30,600 पेक्षा अधिकने वधारुन 71 लाखावर पोहोचली आहे. आकडय़ांच्या आधारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये मे महिन्यात एकूण भांडवलाचा प्रवाह 70,800 कोटी रुपये झाला आहे. जो मागील महिन्यात एप्रिलमध्ये 46,000 कोटी रुपये होता.