वृत्तसंस्था /मुंबई :
चालू आठवडय़ातील चौथ्या दिवशी गुरुवारी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरणीचे सत्र राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. सदरची घसरण नेंदवण्यामागे जागतिक पातळीवरील नकारात्मक वातावरण आणि वित्तीय कंपन्यांच्या समभाग विक्रीमुळे सेन्सेक्स 335 अंकांनी घसरुन बंद झाला आहे.
चौथ्या सत्रात दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 335.06 अंकांनी घसरुन निर्देशांक 37,736.07 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 100.70 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,102.15 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये सर्वाधिक नुकसानीत म्हणजे पाच टक्क्मयांनी इंडसइंड बँकेचे समभाग घसरले आहेत. सोबत एचडीएफसी, ऍक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल यांचे समभाग घसरुन बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सन फार्मा, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग तेजीत राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील संकेतामध्ये मिळते जुळते घेत भारतीय बाजार तेजीसोबत प्रारंभ झाला होता. परंतु दुसऱया बाजूला देशातील वित्तीय कंपन्यांच्या समभाग विक्रीने बाजारातील तेजीचा वेग कमी होत गेल्याचे पहावयास मिळाले आहे. जुलै महिन्याचा वायद्याचा अंतिम दिवस होता यामुळे खरेदी विक्रीने बाजारात चढउतार राहिल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात चीन, हाँगकाँग आणि जपानचा बाजार नुकसानीत बंद झाला असून दक्षिण कोरियाचा बाजार मात्र तेजीसह बंद झाला आहे. जागतिक तेल मानक बेंट क्रूडचा भाव 1.27 टक्क्मयांनी घटून 43.53 डॉलर प्रति बॅरेल राहिले आहे.