वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनच्या दोन सर्वात मोठय़ा शेअर ब्रोकिंग कंपन्यांच्या विलीनिकरणाची चर्चा सुरु असतानाच कम्युनिस्ट देशामध्ये या क्षेत्रात विविध कंपन्यांच्या समभागांनी जोरदार कामगिरी केल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये आजच्या घडीला बाजारमूल्याच्या तुलनेत जगातील दहा सर्वात मोठय़ा शेअर ब्रोकिंग कंपन्यांमध्ये सात कंपन्या या चिनी आहेत.
सीएससी फायनान्शिअलचे समभाग चालू वर्षात 86 टक्क्मयांनी वधारले असून ही कंपनी चीनची सर्वात मोठी ब्रोकिंग कंपनी ठरली आहे. या अगोदर आपले अधिग्रहण करण्याची इच्छा बाळगलेली सिटिक सिक्मयुरिटीज कंपनीपेक्षा जादा मूल्यवान कंपनी बनली आहे.
सिटिकचे समभाग चालू वर्षात 23 टक्क्मयांनी वधारले आहेत. तर याच दरम्यान शांघायचा शेअरबाजाराचा निर्देशांक 9 टक्क्मयांनी तेजीत राहिला आहे. परंतु एप्रिल महिन्यापासून सीएससी फायनान्शिअल आणि सिटिक यांच्यामध्ये अधिग्रहणाबाबत चर्चा सुरु आहे. हे अधिग्रहण शक्मय झाल्यास येत्या काळात सीएससी आणि सिटिक या जगातील सर्वात मोठय़ा ब्रोकिंग कंपन्या ठरणार असल्याची नोंद ब्लूमबर्गच्या एका अहवालामधून देण्यात आली आहे.