प्रतिनिधी/ बेळगाव
शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बेळगाव येथे डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. येळ्ळूर रोडवरील केएलई हॉस्पिटलचे फिजिशियन प्रा. डॉ. मोहम्मद झिया गुट्टी प्रमुख पाहुणे होते. त्यांनी समाजातील डॉक्टरांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली.
एएमएससीचे संचालक डॉ. व्ही. व्ही. वेर्णेकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्राचार्य डॉ. सईद अहमद यांनी हनेमनची शपथ घेतली. यावेळी डॉ. किरण पाटील, पी.जी. समन्वयक डॉ. वरुण एचओडी, फिजिओलॉजी आणि डॉ. असीम एम. पटेल आदी उपस्थित होते.
तस्मिया अर्भवी यांनी सूत्रसंचालन केले. सिफुन आवटी यांनी स्वागत केले. तस्मिया गोकाक यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. युक्ता यांनी आभार मानले. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टरांच्या जीवनावरील पथनाटय़ाने कार्यक्रमाचा समारोप केला.