क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी फौंडेशन आयोजित, के. आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 दुसऱया वर्षाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटप्रेमी मनिष ठक्कर (हुबळी) व परशुराम पाटील (बेळगाव) हे स्पर्धेचे सहावे प्रँचायझी म्हणून लाभले आहेत.
अर्जुन स्पोर्टस्- हुबळी टायगर्स या नावाने त्यांनी आपला संघ उतरविला आहे. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मनिष ठक्कर व परशुराम पाटील यांनी संयुक्तरित्या आपला संघ वरील स्पर्धेसाठी उतरविला आहे.
युनियन जिमखाना मैदानावर होणाऱया स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धा आयोजन समितीचे पुनीत शेट्टी यांच्याहस्ते मनिष ठक्कर व परशुराम पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रणय शेट्टी, वासीम धामणेकर आदी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.