काँग्रेसचा ट्रक्टर मोर्चाद्वारे एल्गार : केंद्र सरकारच्या शेतीधोरणाचा निषेध : शेकडो ट्रक्टरसह हजारो कार्यकर्ते, शेतकरी सहभागी
प्रतिनिधी/कोल्हापूर
केंद्र सरकारच्या शेतीविरोधी कायद्याच्या निषेधार्थ गुरुवारी काँग्रेसतर्फे कोल्हापुरात भव्य ट्रक्टर मोर्चा काढण्यात आला. या कायद्याला महाराष्ट्रात अडविण्याचा इशारा देत कार्यकर्ते, शेतकऱयांनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला. काँग्रेसचा जयघोष तर भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणून गेला. रणरणत्या उत्साहात नेते अन कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह यावेळी दिसून आला.
सकाळी सात वाजल्यापासूनच जिह्याच्या कानाकोपऱयातून ट्रक्टर घेऊन शेतकरी, कार्यकर्ते निर्माण चौक, संभाजीनगर येथे जमायला सुरुवात झाली. बघता बघता काँग्रेसचे तिरंगे झेंडे लावलेल्या ट्रक्टरने मैदान भरुन गेले.
सकाळी अकराच्या सुमारास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, निरिक्षक सोनल पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील, कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार दिनकरराव जाधव, काँग्रेसचे नेते बामसी रेड्डी, देवीदास भन्साळी, मोहन जोशी आदींच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून ट्रक्टर मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये सुमारे साडे सहाशे टॅक्टर सहभागी झाले होते.
सुरुवातीच्या टॅक्टरचे सारथ्य पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. यावर महसूलमंत्री थोरात यांच्यासह एच.के.पाटील, मंत्री विश्वजित कदम बसले होते. त्या पाठोपाठ आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे यांनीही टॅक्टरचे सारथ्य केले. `केंद्र सरकारची दादागिरी नही चलेगी’, काँग्रेस जिंदाबाद, केंद्र सरकारचे शेती धोरण महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोर्चामार्ग दणाणून सोडला. संभाजीनगर चौक, नंगीवली चौक, कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिंदू चौकमार्गे हा मोर्चा दसरा चौकात येऊन त्याचे मेळाव्यात रुपांतर झाले.
या मोर्चात शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण,ऍड. गुलाबराव घोरपडे, ऍड. सुरेश कुराडे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शहराध्यक्षा संध्या घोटणे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, नगरसेवक तौफिक मुल्लाणी,कर्णसिंह गायकवाड, अरुणकुमार डोंगळे, बाळासाहेब खाडे, शामराव देसाई, शंकरराव पाटील, राहुल पाटील, संग्रामसिंह नलवडे सत्यजित पाटील, विक्रम जरग, संपतराव चव्हाण, आनंद माने, सचिन चव्हाण, अर्जुन माने, अश्पाक आजरेकर, बयाजी शेळके, विद्याधर गुरबे, किशोर खानविलकर, उमेश पोर्लेकर, रणजीत पोवार, प्रदीप शेलार, आदी सहभागी झाले होते.
मंत्री, आमदारांनी केले सारथ्य
भाजप सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ गुरुवारी काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रक्टर रॅलीचे आयोजन केले होते. निर्माण चौकातून या रॅलीस प्रारंभ झाला. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज आवळे यांनी स्वतः ट्रक्टर चालविले. तर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल यांच्यासह अनेक प्रमुख नेते टॅक्टरवरुन रॅलीमध्ये सहभागी झाली. दसरा चौकापर्यंत ट्रक्टरवरुनच सभा स्थळी दाखल झाले.
इच्छूकांचे शक्तीप्रदर्शन
राज्यात सद्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्या सोबत शासकीय समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिह्यातील या समितीच्या नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. गुरुवारच्या मोर्चाला महाराष्ट्र काँग्रेसचे दिग्गज नेते कोल्हापूरात आलो होते. यामुळे विविध समित्यांसाठी इच्छूक असणाऱया उमेदवारांनी गुरुवारच्या मोर्चात आपले शक्तिप्रदर्शन करुन घेतले. तसेच आगामी महापालीका निवडणूकीसाठी इच्छूक असणाऱया उमेदवारांनीही आपले शक्तिप्रदर्शन केले.
महापौर ट्रॅक्टरवर
काँग्रेसच्या महापौर निलोफर आजरेकर या स्वतः ट्रक्टरवरुन मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासमवेत कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, माजी नगरसेविका संध्या घोटणे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, यांच्यासह महिला पदाधिकारी मोर्चामध्ये ट्रक्टरवरुन सहभागी झाल्या होत्या. कॉग्रेस महिला सेलच्या पदाधिकारी मोर्चामध्ये ट्रक्टरवरुन सहभागी झाल्या होत्या.
घोषणा, झेंडे, कमानी
मोर्चामध्ये काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रत्येक कार्यकर्त्यांने गळ्यामध्ये मफलर, झेंडे घालून सहभगी झाले होते. निर्माण चौकसह संपूर्ण मोर्चा मार्ग, दसरा चौक परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता. निर्माण चौक आणि दसरा चौकाच्या मैदानावर भव्य कमान आणि भव्य स्टेज उभारण्यात आले होते. प्रत्येक ट्रक्टरवर काँग्रेसचे झेंडे आणि मोर्चाचे फलक लावण्यात आले होते. काही ट्रक्टरवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्याचे फलक आणि चित्ररथ लावण्यात आले होते.
किल्ल्या ताब्यात ठेवा
मोर्चामध्ये गुरुवारी जिह्याच्या कानाकोपऱयातून शेतकरी, ट्रक्टरसह सहभागी झाले होते. निर्माण चौक मैदान ट्रक्टरने पुर्णपणे भरुन गेले होते. मोर्चामध्ये 600 हून अधिक ट्रॅक्टर सहभागी होते, तर प्रत्येक ट्रक्टरवर तीन ते चार शेतकरी हेते. सकाळी 10 वाजल्यापासून निर्माण चौकात शेतकऱयांनी गर्दी केली होती. यामुळे संयोजक वारंवार सुचना देत होते. यामध्ये प्रत्येकाने आपल्या ट्रक्टरच्या किल्ल्या आपल्या ताब्यात ठेवा असे निवेदन केल्यानंतर मैदानामध्ये एकच हशा पिकला.
रस्त्याचे पॅचवर्क
गुरुवारी होणाऱया मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा मार्गावरील खडÎांचे पॅचवर्क करण्यात आले होते. संभाजीनगर पासून, मिरजकर तिकटी आणि मिरजकर तिकटी ते दसरा चौका मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडले होते. गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले पॅचवर्कचे काम मोर्चाच्या पूर्वसंध्येला रातोरात करण्यात आले.