प्रतिनिधी / सोलापूर
कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असून आजपर्यंत २० शेतकरी शाहिद झाले आहेत. या शाहिद शेतकऱ्यांना मान वंदना देण्यासाठी रविवारी २० डिसेंबर संध्याकाळी ७:०० वाजता, आम आदमी पार्टी सोलापूरतर्फे हुतात्मा चार पुतळा, सोलापूर येथे मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस, आप सोलापूर शहराध्यक्ष मो. अस्लम शेख, प्राजक्त चांदणे, बाबा सगरी, नासिर मंगलगिरी, ज्योती गायकवाड, इलियास शेख, रहीम शेख, सुनीता गौडर, रॉबर्ट गौडर, निहाल किरनळ्ळी, नरसिंग म्हेत्रे, मदनी आदी उपस्थित होते.