-कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना
पंढरपूर / प्रतिनिधी
जिह्यात पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत योग्य पद्धतीने कार्यवाही करून एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
अजनाळे (ता. सांगोला) येथे सोलापूर जिह्यातील रिसोर्स फार्मर्स व पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्यासोबत झालेल्या परिसंवादात ते बोलत होते. या वेळी आमदार शहाजी पाटील, पंचायत समिती सभापती राणी कोळवले, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, प्रबुद्धचंद्र झपके, प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, तहसीलदार अभिजित पाटील, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, शिवाजी शिंदे, संभाजी शिंदे, भाऊसाहेब रूपनर आदी उपस्थित होते.
यावेळी कृषिमंत्री भुसे म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱयांना तातडीने फळ पीक विम्याची रक्कम देण्याबाबत विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या शेतात पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. अतिवृष्टी व गारपिटीमुळे द्राक्षबागांचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी विद्यापीठाला अभ्यास करण्याची जबाबदारी दिली जाईल. यावर शास्त्रीय व तांत्रिक पद्धतीने अभ्यास करून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. तसेच सांगोला तालुक्मयात मोठÎा प्रमाणात डाळिंब उत्पादन घेतले जाते. डाळिंब पिकावर तेल्या, मर व कुजवा या रोगामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची डाळिंब संशोधन केंद्राने पाहणी करावी. यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत शेतकऱयांना मार्गदर्शन करावे, यासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सांगोला तालुक्मयातील अतिवृष्टी व तेल्या रोगामुळे नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱयांना भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार शहाजी पाटील यांनी केली. सांगोला येथे मध्यवर्ती प्रयोगशाळा व्हावी, अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली. यावेळी पीकस्पर्धा विजेते शेतकऱयांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
तत्पूर्वी कृषिमंत्री भुसे यांनी शेतकऱयांच्या बांधावर जाऊन शेतपिकांची पाहणी केली व शेतकऱयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी बामणी येथील शेतकरी सदाशिव साळुंखे यांच्या ड्रगन प्रुट पिकाची पाहणी केली. तर यलमार मंगेवाडी येथे राजेंद्र यलपले यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. तसेच अजनाळे येथील तेल्या, मर व कुजवा या रोगामुळे नुकसान झालेल्या डाळिंब पिकाची पाहणी करून याबाबत संबंधित अधिकाऱयांना आवश्यक त्या सूचना दिल्या.