नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारीला शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी दुपारी 12 वाजता पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 10 वा हप्ता हस्तांतरित करतील, असे जाहीर करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर काही वेळातच शेतकऱयांच्या खात्यात किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱयांना आपल्या बँकखात्याचे ई-केवायसी पूर्ण करून घेण्याची किंवा आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्याची सूचना यापूर्वीच करण्यात आली होती.