हेस्कॉमकडून वाघवडे, मच्छे, किणये भागात दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा सुरू : मोर्चा तूर्तास रद्द : शेतकऱयांनी दाखविली एकजूट
वार्ताहर /किणये
मच्छे, वाघवडे, किणये भागात शेतकऱयांना दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा द्या, अशी मागणी दोन महिन्यांपासून शेतकऱयांनी लावून धरली होती. दि. 24 रोजी हेस्कॉमच्या मुख्य कार्यालयावर शेतकऱयांचा विराट मोर्चा काढून दिवसा वीजपुरवठा द्या, यासाठी आंदोलन छेडण्यात येणार होते. मात्र, या भागात हेस्कॉमकडून दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्यामुळे हे आंदोलन तूर्तास रद्द करण्यात आले असून शेतकऱयांच्या एकजुटीला यश आले आहे.
पिरनवाडी, मच्छे, संतिबस्तवाड, झाडशहापूर, वाघवडे, किणये, रणकुंडये, शिवनगर, बहाद्दरवाडी, नावगे, कर्ले, जानेवाडी या भागात रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीजपुरवठा करण्यात येत होता. यामुळे शेतकऱयांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी अंधारातच शेताकडे जावे लागत होते. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा दिल्यास आम्ही शेती कशी करायची? असा प्रश्नही शेतकऱयांसमोर उभा राहिला होता.
रोज रात्री शेतकरी शिवारात
सध्या उन्हाळय़ाचे दिवस असून मच्छे, किणये, वाघवडे या भागात भाजीपाला पिके अधिक प्रमाणात घेण्यात येतात. यात प्रामुख्याने बटाटा, मिरची, बिन्स, लालट भाजी, मेथी, कोथिंबीर, गाजर, कोबी, फ्लॉवर आदी भाजीपाला पिकांसह उसाचे पीक घेण्यात येते. या पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळेस शेतकऱयांना शिवारात जावे लागत होते. यामुळे या भागातील शेतकरी अक्षरशः वैतागून गेला होता. महिनाभरापूर्वी तालुका म. ए. समितीच्यावतीने हेस्कॉमचे मुख्य अधिकारी प्रवीण चिकार्डे यांना निवेदन देऊन या भागात दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा द्या, अशी मागणी करण्यात आली होती. गेल्या आठवडाभरापूर्वी पुन्हा निवेदन देऊन 23 तारखेच्या आत दिवसा वीजपुरवठा द्या. अन्यथा 24 रोजी तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता.
शेतकऱयांच्या मागणीची हेस्कॉमकडून दखल
शेतकऱयांच्या मागणीचा विचार करून अखेर हेस्कॉमकडून मच्छे, वाघवडे, झाडशहापूर, किणये या भागात दिवसा वीजपुरवठा तीन दिवसांपासून सुरू करण्यात आला आहे. या मोर्चासंदर्भात मच्छे येथे शेतकऱयांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी सुरेश लाड होते. यावेळी एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, तालुका म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, चेतन पाटील, मल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते.
मोर्चासंदर्भात बुधवारी दुपारी तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी हेस्कॉमचे अधिकारी प्रवीण चिकार्डे यांना फोनवरून संपर्क केला असता किणये, झाडशहापूर भागात सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंत थ्रीफेज विद्युतपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
वाघवडे व संतिबस्तवाड भागातही दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला असून येत्या चार दिवसांत या सर्व भागात सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे चिकार्डे यांनी किणेकर यांना सांगितले. यामुळे शेतकऱयांनी मोर्चा रद्द केला आहे.
यावेळी ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. शाम पाटील, मोनाप्पा पाटील, जोतिबा आंबोळकर, अनिल पाटील, महादेव मंगणाकर, आप्पा कीर्तने, मल्लाप्पा गोरल, कृष्णा आंबोळकर, संतोष आंबोळकर, सुभाष देसाई, रघुनाथ नाईक, नागेंद्र पाटील, महादेव बिर्जे, विनायक पाटील आदी उपस्थित होते.
एपीएमसी माजी सदस्यांचा पुढाकार
रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीजपुरवठा देण्यात येत होता. याचा त्रास शेतकऱयांना सहन करावा लागत होता. शेतकऱयांसाठी वाघवडे गावातील एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील यांनी पुढाकार घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी शेतकऱयांच्या बैठका घेऊन तालुका म. ए. समितीच्या वरि÷ नेतेमंडळींना माहिती देऊन अनेकदा हेस्कॉमला निवेदने दिली. शेतकऱयांच्या एकजुटीमुळे अखेर या भागात दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या एकजुटीबरोबरच त्या एपीएमसी माजी सदस्यांचेही या भागात कौतुक होत आहे.