शेताच्या बांधावरच शेतकऱयांना पिकासंबंधी उपलब्ध होतेय माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने विकसित केलेल्या ‘कृषीज्ञान’ या कृषीसंबंधी माहिती देणाऱया ऍपला शेतकऱयांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे शेतकऱयांना ‘कृषीज्ञान’ हे
ऍप लाभदायक ठरत आहे. कृषी खात्याच्या तज्ञांना व अधिकाऱयांना प्रत्येक शेतकऱयाच्या शेताकडे जाणे शक्मय नाही. अशावेळी कृषीज्ञान
ऍप कृषी खाते व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यास मदत होणार आहे. शेतकऱयांना या ऍपच्या माध्यमातून कमी खर्चात शेताच्या बांधावरच शेतीसंबंधी माहिती उपलब्ध होणार आहे.
गतवषी या ऍपद्वारे 473 शेतकऱयांना शेतीसंबंधी समस्यांबाबत तातडीने माहिती पुरविण्यात आली होती. शेतकऱयांनी खरीप हंगामात भात, ज्वारी, मका, बाजारी, भुईमूग, सोयाबिन, कापूस आदी पिकांची पेरणी केली. मात्र काहीवेळेला पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान सोसावे लागते. याकरिता कृषीज्ञान ऍपद्वारे शेतकऱयांना शेतातच प्रतिबंधात्मक औषधांची माहिती दिली जाते. शिवाय शेतकरी किडीबाबतचा लहान व्हिडिओ करून कृषी खात्याकडे पाठवू शकतो. पाठविलेला व्हिडिओ पाहून कृषी खात्याचे तज्ञ व अधिकारी संबंधित शेतकऱयाला ऍपद्वारे माहिती पुरविणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱयाकडे स्मार्ट ऍण्ड्रॉईड फोन असणे आवश्यक आहे.
या ऍपद्वारे वादळ, अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट अशा नैसर्गिक संकटांची माहिती अगोदर समजते. त्यामुळे होणारे नुकसान टाळता येते. शिवाय केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेविषयी माहिती मिळण्यास मदत होणार असल्यामुळे हे ऍप शेतकऱयांना लाभदायक ठरत आहे.
पिकांवर होणारी कीड नियंत्रणात आणता येणार
शेतकऱयांना या ऍपद्वारे पीक विम्याबाबत व इतर शेतीसंबंधी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. शिवाय शासनाच्या योजनाही समजण्यास मदत होणार आहे. पिकांवर होणारी कीड नियंत्रणात आणता येणार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी ऍप डाऊनलोड करून शेतीसंबंधी असलेल्या समस्या सोडवून घ्याव्यात.
–डॉ. एच. डी. कोळेकर (उपनिर्देशक कृषी खाते बेळगाव)