केंद्र सरकारने केले ऍप लाँच, पीक नुकसानीची माहिती देता येणार
विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे आता अधिक सुलभ झाले आहे. विमा उतरवण्यासाठी शेतकऱयांना विमा कंपनीच्या दारात जावे लागणार नाही. शेतकऱयांच्या सोयीसाठी केंद सरनकारने पीक विमा मोबाईल ऍप नुकतेच लाँच केले आहे. या माध्यमातून घरबसल्या विमा हप्त भरता येणार असून नुकसानीची माहितीही देता येणार आहे. ऍप मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेतून हाताळता येणार आहे. भारत सरकारच्या कृषी, शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही सुविधा दिली आहे.
पीक विमा उतरवणे, हप्ता भरणे आणि नुकसान झाले तर भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लगत होते. त्यात विमा कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकऱयांची पिळवणूक होते होती. यातून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन खास पीक विम्यासाठी ऍपची निर्मीती केली आहे.
ऍपचा वापर कसा करावा
गुगल प्ले स्टोअरवर ऍप उपलब्ध केले आहे. ऍप डाऊनलोड कण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर `Crop Insurance App’ टाईप करुन ऍप डाऊडलोड करावे. प्रक्रिया (इंस्टॉलेशन) पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या विविध माहिती, सेवांचा लाभ घेता येतो. लिंकवरही ऍप उपलब्ध केले आहे. अन्य ऍप प्रमाणेच डाऊनलोड करण्याची सुटसुटीत प्रक्रिया आहे. शेतकऱयांच्या विविध सेवांचा लाभ या ऍपमधून घेता येणार आहे. ऍपची नोंदणी केल्यानंतर कोणत्याही कागदपत्रांची गरज लागणार नाही.
नुकसानीची महिती भरण्यासाठीही मार्गदर्शन
शेतकरी त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि संकेत शब्दाद्वारे (पासवर्ड) ऍप लॉगइन करता येते. त्यानंतर पुढील पानावर वापरकर्त्याने नुकसानीची माहिती हा टॅब निवडल्यानंतर ओटीपी मिळवण्यासाठी मोबाईल नंबर नमुद करावा. ओटीपी आल्यानंतर शेतकऱयाने हंगाम, वर्ष, योजना या विषयी माहिती भरता येते.
ऍपवर मिळणाऱया सेवा
पीक नुकसान पूर्व सूचना, विमा हप्ता निश्चित, शेतकऱयांच्या योजनेविषयी प्रश्न आणि मदत केंद्र