गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांचे आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर:
गोकुळ संलग्नग्न पांडूरंग सहकारी दूध संस्था खेबवडे, ता. करवीर, संस्थेचे दूध उत्पादक दिनकर बळवंत पाटील यांचे अतिवृष्टीमुळे घर व गोठÎाची पडझड झाली असता यामध्ये गाभण तीन जनावरे अतिगंभीर जखमी झाले आहेत. त्यात त्यांचे अंदाजे दोन ते तीन लाख रूपये इतके नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मिळताच गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी तात्काळ संघाच्या चुये सेंटर कडील डॉक्टराच्या कडून जनावराच्या वर उपचार करण्याच्या सुचना दिल्या व प्रत्यक्षात पाटील कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले व दूध संघाशी संलग्न सर्व दूध उत्पादकांनी संघाची किसान विमा पॉलिसी करावी यामुळे येणाऱया आर्थिक संकटाला तोंड देता येईल. असा सुचना देखील केल्या.
यावेळी संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील उपसरपंच सुयोग वाडकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, आदी उपस्थित होते.