बेंगळूर/प्रतिनिधी
दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आज देशभरात रेल रोकोची हाक दिली होती. दरम्यान कर्नाटकातील शेतकऱ्यांनीही या हाकेला प्रतिसाद देत रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बेंगळूरमधील यशवंतपूर रेल्वे स्थानकात आज शेतकरी रेल्वे रोको करण्यासाठी गेले असता पोलिसांनी शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. परवानगी दिली आंही शेतकर्यांनी रेल्वे रोको काढला.
माध्यमांशी बोलताना एका शेतकरी नेत्याने सांगितले, जेव्हा आम्ही रेल्वे स्थानकात पोहोचलो तेव्हा येथे पोलिसांकडून आम्हाला रेल्वे रोको करण्यास परवानगी नसल्याचे सांगितले. शेतकर्यांच्या संघटनांनी अनोलन करण्यास सांगितले असता पोलिसांची परवानगी कशासाठी ? असे म्हंटले आहे.