प्रतिनिधी/ सातारा
सोनगाव तर्फ सातारा (ता. सातारा) येथे शेतजमिनीत नांगरट करत असताना जमिनीच्या वादातून सावत्र भाऊ, त्याचे नातेवाईकांकडून नात्याने सावत्र असलेल्या बहिणीस मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी भावासह चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रार महिला बानू गुलाब मोमीन (वय 59 रा. सोनगाव तर्फ सातारा) या दि. 15 मार्च रोजी त्यानंतर दि. 11 जून 2021 रोजी त्यांच्या सोनगावातील भाऊ बाबालाल, बहीण रजिया यांच्यासमवेत नांगरट करण्यास गेल्या होत्या.
त्यावेळी त्यांचा सावत्र भाऊ खुदबुद्दीन गुलाब मोमीन, त्याची दुसरी पत्नी हाफिजा खुदबुद्दीन मोमनी, इरशाद सत्तार (सर्व रा. सोनगाव तर्फ सातारा) व बालेखान सत्तार (रा. अतित, ता. सातारा) यांनी बानू मोमीन यांना तू इथे शेत नांगरायचे नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली व शेतातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तक्रारदाराचा भाऊ व भावजय भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना देखील धक्काबुक्की, शिवीगाळ केली. तर दि. 11 रोजी देखील वरील संशयितांनी नातेवाईकांसोबत येवून तक्रारदार व तिच्या भाव, भावजयीला याच कारणातून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस हवालदार खुडे करत आहेत.