प्रतिनिधी/ मसूर
शेततळ्यात पोहायला गेलेल्या नऊ जणांपैकी दोन मुलींसह एका मा†हलेचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. मजूर कुटुंबातील ा†तघींवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्य‹ होत आहे. दरम्यान सुदैवाने सहाजण या घटनेत बचावले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुर्दैवी घटनेची नोंद मसूर पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे.
शोभा ा†नतीन घोडके (वय 35), सरस्वती रामचंद्र खडतरे (वय 8) व वैष्णवी गणेश खडतरे (वय 15, सर्व रा. सद्या पाडळी, मूळ रा. कार्वे नाका, कराड) अशी शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत झालेल्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून ा†मळालेली मा†हती अशी की, कराड तालुक्यातील पाडळी (हेळगाव) येथे शेतकऱ्यांच्या शेतावर अनेक शेतमजूर कुटुंबे काम करतात. पाटील नामक शेतकऱ्याच्या शेतात सुद्धा मजूर मा†हला, पुरूष काम करतात. त्यांच्या शेतात डोंगरालगत पाण्यासाठी मोठे शेततळे बांधण्यात आले आहे.
दोरीच्या आधाराने पोहताना घटना
सध्या कडाक्याच्या उन्हामुळे शेततळ्यावर शेतमजुरांसह अनेकजण पोहण्यासाठी जातात. शेततळ्यात काही पोहणारांनी पोहताना आधार ा†मळावा म्हणून दोरी बांधली. मंगळवारी बारा वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे दहा जण गेले होते. यावेळी ज्यांना पोहता येत नाही, असे दोरीचा आधार घेत पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पोहण्यासाठी मृत मा†हलेसह दोन्ही मुली शेततळ्यात उतरल्या होत्या. पोहण्याचा प्रयत्न करत त्या दोरीला पकडून होत्या.
दोरी तुटली अन् अंत झाला
शेतळ्यात आधारासाठी बांधलेल्या दोरीला पोहता न येणाऱ्या अनेकांनी पकडले होते. त्यामुळे दोरीवर जास्त प्रमाणात भार पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सां†गतले. भार पडल्याने अचानक दोरी तुटली. त्यामुळे दोरीचा आधार घेतलेले सर्वजण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. शेततळ्यात पोहणाऱ्या इतरांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी बुडणाऱ्यांना हात देण्याचा, वाचवण्याचा प्रयत्न केला.
दुर्दैवाने ा†तघी बुडाल्या…
बुडत असलेल्यांना वाचवण्याची धडपड सुरू असतानाच आरडाओरड सुरू झाली. यातही सहा जणांना कसेबसे शेततळ्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र एका मा†हलेसह अन्य दोन मुली शेततळ्यातील पाण्यात बुडाल्या. त्यांनाही तात्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपा†जल्हा ऊग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सां†गतले.
दरम्यान, या घटनेने पाडळी (हेळगाव) पा†रसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी पोलीस आ†धक तपास करीत आहेत.