विषारी औषध प्राशन करून संपवली जीवनयाञा : मगरवाडी येथील घटना : विषारी औषध प्राशन करतानाचा व्हिडिओ व्हायरल
पंढरपूर/प्रतिनिधी
शेतकर्यांच्या नादाला कधी सरकारसुध्दा लागत नाही, शेतकर्याच्या जन्माला परत कधीच येणार नाही’ असे म्हणत मगरवाडी ता.पंढरपूर येथील सुरज जाधव या युवा शेतकर्याने बुधवार 2 मार्च रोजी विषारी औषध प्राशन केले होते. पंढरपूर येथील रुग्णालयात शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी सुरज जाधवने एक व्हिडीओ बनवला. यात तो म्हणतोय, शेतकर्याच्या जन्माला आपण परत कधीच येणार नाही. आपलं आयुष्य इथ पर्यंतच होतं. इथून पुढे आयुष्य नाही. शेतकरी नामर्द आहे. त्यामुळे शेतकर्याच्या जन्माला आपण येणार नाही. सरकार कधी शेतकर्याच्या नादाला लागत नाही. सरकार शेतकर्याचा कधी विचार करत नाही, अस म्हणत त्याने बुधवार दि. 2 मार्च रोजी शेतामध्ये विषारी औषध प्राशन केले होते.
या तरुणाला पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी 2 मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले हेाते. उपचारादरम्यान पंढरपूरच्या रुग्णालयात 4 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला.
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथे सुरज जाधव हा तरुण शेतकरी राहत होता. विषारी औषध पिण्यापूर्वी त्याने स्वतःचा व्हिडिओ तयार करुन व्हायरल केला होता. पंढरपुरातील तरुण शेतकर्याने विषारी औषध प्राशन करुन आपलं आयुष्य संपविल्याने हळळळ व्यक्त होत आहे. सदर घटनेची पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
शेती समस्यांमुळेचे केली आत्महत्या
अतिवृष्टी, दुष्काळ, शेतीमालाचे पडलेले बाजारभाव, महावितरणची सक्तीची विजवसूली, कोरोनामुळे दोन वर्षांत शेतीचे झालेले नुकसान, शेतीपूरक व्यवसायाला आलेली उतरती कळा यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारकडून शेतकर्यांना मदत करण्याऐवजी आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. सत्ताधारी व विरोधकांत फक्त राजकीय कुरघोडी सुरू आहे. शेतकर्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी सरकार व विरोधकांना वेळ नाही. त्यामुळे सुरज जाधव या युवा शेतकर्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.