प्रतिनिधी / बेळगाव
मच्छे येथे उसाचे बहारदार पीक असलेल्या शेतातच जेसीबी फिरविण्यास सुरुवात केली. आपल्या पिकात जेसीबी फिरतानाचे दृष्य पाहून दोघा भावांनी आपल्या जीवाची बाजी लावली. यावेळी आकाश अनगोळकर याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन तर अमित अनगोळकर याने झाडावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे धास्तावलेल्या पोलीस आणि प्रशासनाची एकच गोची झाली. परिणामी काहीकाळ काम थांबवून प्रशासनाला नमते घ्यावे लागले. या दोघा भावांनी आपल्या शेतीसाठी जीवाची बाजी लावली.
एका शेतकऱयाचा मुलगा आकाश अनगोळकर याने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले तर त्यांचा दुसरा मुलगा अमित अनगोळकर हा झाडावर चढून काम बंद करा, अन्यथा येथून उडी टाकून जीव देऊ, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे कंत्राटदार आणि पोलीस प्रशासनाने काहीवेळ नमते घेतले. या घटनेची माहिती वरि÷ पोलीस अधिकाऱयांना देण्यात आली. पोलीस उपायुक्त विक्रम आमटे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमित याला तुमच्या पिकाची दुप्पट नुकसानभरपाई देऊ, तुम्ही सांगता तो दर देऊ मात्र झाडावरून खाली उतर, अशी विनवणी केली.
आपल्या पिकात जेसीबी फिरवल्याने शेतकऱयाचे कुटुंबीयही हतबल झाले होते. त्याची आई, वडील, बहीण व इतर नातेवाईक यांनी आक्रोश सुरू केला. त्यांनी प्रशासनाला काम बंद करा, अशी विनवणी केली. तरीदेखील प्रशासनाने झाडावर चढलेल्या अमितला विनवणी करून खाली उतरविले. यावेळी अमित याने आम्ही रात्रंदिवस काम करून ऊस पिकविण्यासाठी मोठे कष्ट उपसले आहेत. येत्या काही दिवसांत शेतामधील ऊस कारखान्याला पाठविणार होतो. आम्ही जमिनीचे पैसे घेतलो नाही. नोटिफीकेशनमध्ये आमच्या जमिनीचा सर्व्हे क्रमांक नाही, असे सर्व काही सांगितले. मात्र तुम्ही पैसे घ्या आणि रस्ता करण्यास मुभा द्या, यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर दबाव आणला. पोलिसांनी त्या कुटुंबावर दडपशाही करण्यास सुरुवात केली. इतर शेतकऱयांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला.