ऑनलाईन टीम / सिडनी :
क्रिकेटमधील महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या ग्रीन टेस्ट कॅपचा आज लिलाव झाला. शेन वॉर्न यांची ही कॅप लिलावात तब्बल 10 लाख 7 हजार पाचशे ऑस्ट्रेलियन डॉलर्सला विकली गेली. भारतीय चलनानुसार या कॅपची किंमत 4 कोटी 92 लाख 8 हजार रुपये होते.
क्रिकेटर शेन वॉर्न यांनी त्यांच्या 145 कसोटी सामन्यात ही कॅप घातली होती. मात्र, ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या भीषण आगीतील पीडितांच्या मदतीसाठी त्यांनी या कॅपचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी याबाबतचे ट्विट केले. त्यानंतर एका ऑनलाईन वेबसाईटवर या कॅपचा लिलाव करण्यात आला.
शेन वॉर्न यांना अपेक्षित असलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम या लिलावातून मिळाली. त्यामुळे त्यांनी ही कॅप खरेदी करणाऱयाचे आभार मानले. तर लिलावासाठी बोली लावणाऱया व्यक्तींनाही धन्यवाद दिले. या लिलावातून मिळालेली सर्व रक्कम ते थेट रेड क्रॉस बुशफायरला देणार आहेत.