वृत्तसंस्था/ सिडनी
सिडनी क्रिकेट मैदानावर शेफिल्ड ढाल क्रिकेट स्पर्धेतील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या दोन संघातील शुक्रवारचा सामना कोरोनामुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतल.
या स्पर्धेत सहभागी विल सुदरलँडची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आणि हा सामना लांबणीवर टाकण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. शुक्रवारच्या या सामन्यातील नाणेफेकीला एक तास बाकी असताना सदर क्रिकेटपटूला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर व्हिक्टोरिया संघातील सर्व खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. क्रिकेट ऑस्टेलियाकडून या स्पर्धेतील आगामी सामन्यांच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.