श्री नारायण सिंह करणार दिग्दर्शन
विद्युत जामवालच्या कारकीर्दीतील पहिल्या बायोपिक चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे नाव शेर सिंह राणा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्ा़खाr नारायण सिंह करणार आहेत. तर विनोद भानुशाली या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
बॉलिवूडमध्ये स्वतःच्या दमदार आणि वेगळय़ा प्रकारच्या ऍक्शनसाठी प्रसिद्ध विद्युत यात मुख्य भूमिका साकारणार आहे. शेर सिंह राणा हा माझा पहिला बायोपिक आहे. नियतीने सर्व पैलूंना जोडले आणि निडर शेर सिंह राणांची भूमिका माझ्यापर्यंत पोहोचविल्याचे मला वाटते. विनोद भानुशाली आणि श्री नारायण सिंह यांच्यासोबत काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे विद्युतने म्हटले आहे.
शेर सिंह राणा यांची कहाणी ऐकल्यावर त्यांचे जीवन आणि अनुभव अत्यंत रोमांचक आणि कटांनी भरलेले होते हे समजते. या चित्रपटात विद्युत पहिल्यांदाच वेगळय़ा प्रकारची भूमिका साकारणार आहे. स्वतःच्या देशासाठी काही तरी करणे हे एकमात्र ध्येय असलेल्या व्यक्तीची ही कहाणी असल्याचे श्री नारायण सिंह यांनी नमूद केले आहे.
कोण आहेत शेर सिंह राणा?
शेर सिंह राणा यांना कथितरित्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे अवशेष अफगाणिस्तानच्या कंधारमधून परत आणण्यासाठी ओळखले जाते. राणा यांना 2001 मध्ये फूलन देवी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. 2004 मध्ये ते तिहार तुरुंगातून पसार झाले होते. पुन्हा अटक झाल्यावर राणा यांनी मधल्या काळात पृथ्वीराज चौहान यांचे अवशेष भारतात आणण्यास यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. 2016 मध्ये राणा यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला होता.