वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
जमैकाची आंतरराष्ट्रीय महिला धावपटू 34 वर्षीय शेली ऍन प्रेजरने शनिवारी येथे झालेल्या ऑलिंपिक चाचणी ऍथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत दुसऱया क्रमांकाची जलद वेळ नोंदवून आगामी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे.
महिलांच्या 100 मी धावण्याच्या शर्यतीत शेली प्रेजरने 10.63 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले. या क्रीडाप्रकारात तिची ही दुसऱया क्रमांकाची सर्वात जलद वेळ नोंदविली गेली आहे. प्रेजरने यापूर्वी दोनवेळा ऑलिंपिक स्पर्धेत 100 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले आहे. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेची फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनरचा 10.49 सेकंदाचा विश्वविक्रम आहे.