प्रतिनिधी/ नागठाणे
शेळकेवाडी (ता. सातारा) येथे नुकतीच कृषी विभागाच्या वतीने ऊस पिकाविषयी महिलांची शेतीशाळा आयोजित करण्यात आली. मंडल कृषी अधिकारी सुहास यादव, पर्यवेक्षक शिवदास कदम, सहायक हेमलता फडतरे यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती.
एकरी 100 टन उत्पादन, कमीत कमी उत्पादन खर्च यावर शेतीशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि जैविक खतापासून होणारे फायदे याबद्दलही माहिती देण्यात आली. प्रवीण शेळके यांनीही आपले विचार व्यक्त केले. सरपंच रेश्मा शेळके यांनी स्वागत केले. संभाजी शेळके यांनी प्रास्ताविक केले. सोसायटीचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी आभार मानले. या वेळी मोठय़ा संख्येने महिला तसेच शेतकरी उपस्थित होते.