सेन्सेक्स 110 तर निफ्टी 18 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील तेजीमुळे चालू आठवडय़ातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मात्र घसरणीसह बंद झाले आहेत. व्यवसायातील सुस्तीमुळे मोठय़ा कंपन्यांचे निर्देशांक कोसळले आहेत. याचा नकारात्मक परिणाम म्हणून सेक्सेक्सची 110 अंकांची घसरण झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर प्रमुख कंपन्यांच्या निर्देशांकातील प्रभावामुळे दिवसअखेर सेन्सेक्स 110.02 अंकांनी घसरुन निर्देशांक 44,149.72 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 18.05 अंकांनी घसरुन निर्देशांक 12,968.95 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्पोरेशनचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच एचसीएल टेक, ओएनजीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, ऍक्सिस बँक, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला एशियन पेन्ट्स, टायटन, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि बजाज ऑटोचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.
जीडीपी अहवालाचा प्रभाव
तिमाहीमधील आर्थिक विकासदरासंदर्भातील (जीडीपी) अंदाज व्यक्त होण्याअगोदरच जागतिक पातळीवरील बाजार तेजीत असतानाही देशातील शेअर बाजार घसरणीसह बंद झाले आहेत. अनलॉकनंतर काही प्रमाणात अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु अर्थव्यस्था पूर्णपणे सुधारल्याचे संकेत नसल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यामुळे देशातील शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे.
आशियाई बाजारात प्रारंभी घसरण राहिली होती. परंतु काही वेळानंतर बाजार सावरला होता. यामध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या समभागांची मजबूत खरेदी झाल्याचे दिसून आले. प्रमुख निर्देशांक असणाऱया कंपन्यांचे मूल्यांकन चालू मिडकॅप समभाग गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत.