साहित्य : 1 वाटी शेवया, 1 वाटी रवा, दीड वाटी दही, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा इनो अथवा बेकिंग सोडा, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठीः 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा चणाडाळ, 1 चमचा काजू तुकडे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 4 कढीपत्ता पाने, 1 इंच आलं खिसून
कृती : गरम पॅनवर शेवया आणि रवा स्वतंत्ररित्या हलक्या गुलाबी रंगावर परतवून बाऊलमध्ये काढावे. फोडणीसाठी गरम तेलात मोहरी टाकून तडतडावी. नंतर त्यात चणाडाळ आणि काजू टाकून गुलाबी रंगावर परतवावे. नंतर हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आलं टाकून मिनिटभर परतवून शेवया-रवा मिश्रणात मिक्स करावे. त्यात दही आणि लागल्यास थोडेसे पाणी घालून इडली बॅटर तयार करून 20 मिनिटे ठेवावे. आता मिश्रण थोडे कोरडे वाटल्यास त्यात थोडेसे पाणी मिक्स करून त्यात कोथिंबीर, मीठ आणि इनो मिक्स करावे. आता इडली पात्राला तेलाचा हात लावून त्यावर इडली बॅटर घालून इडली वाफवून घ्यावी. आता तयार शेवया इडली चटणीसोबत खाण्यास द्या.