प्रतिनिधी /बेळगाव
केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीतर्फे अशोक आयर्न वर्क्सला विद्यार्थ्यांनी भेट दिली. तिसऱया सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट फॅक्टरी संकल्पना समजावी, या हेतूने ही भेट आयोजित करण्यात आली होती.
यावेळी श्रद्धा बेल्लद यांनी विद्यार्थ्यांना कारखान्याची माहिती देऊन नवीन तंत्रज्ञान कंपनीने कसे आत्मसात केले, याची माहिती दिली. तसेच कारखान्यातील कार्यपद्धती कशी चालते याची माहितीही त्यांनी दिली. प्रा. डॉ. बसवराज कटगेरी यांनी या सहकार्याबद्दल अशोक आयर्नच्या व्यवस्थापनाचे आभार मानले. डॉ. प्रयोग गोखले यांनी या भेटीचे आयोजन केले होते.