मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे पणजीत प्रतिपादन – उच्च शिक्षण संचालनालयाच्या मांडवी उपक्रमाचा शानदार शुभारंभ
प्रतिनिधी /पणजी
उच्च शिक्षण संचालनालयाने निर्माण केलेला मांडवी हा उपक्रम आधुनिक युगात शिकणाऱयांसाठी नवा पूल ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ते उच्च शिक्षण संचालनालयाने निर्माण केलेल्या मांडवी या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. पणजी येथील मनोरंजन सोसायटीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात यावेळी मंचावर शिक्षण सचिव रवी धवन, मुख्य सचिव पुनीत गोयल, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर, प्रो. कविता असनानी, प्रो.विठ्ठल तिळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मांडवी उपक्रम हा ज्ञान देणारा असून संपूर्ण राज्यांसाठी आदर्शवत ठरणार आहे. त्यामुळे गोवा राज्य देशभरातील राज्यांसमोर आदर्श ठरणार आहे. गोवा संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले. स्वागत उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी केले. कविता असनानी यांनी अहवाल वाचन करून मॅसिव्ह ऑनलाईन कोर्ससंदर्भातील (श्ध्ध्ण्s) माहिती दिली. यावेळी या उपक्रमाशी संबंधित समन्वयक शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. तर विठ्ठल तिळवी यांनी आभार मानले.
असा आहे मांडवी उपक्रम
1.मांडवी ((शहूदग्हु aह् ऱल्rtल्rग्हु अुग्taत् aह् न्ग्rtल्aत् घ्हग्tग्atग्ने ) या उपक्रमाच्या माध्यमातून उच्च शिक्षण संचालनालय मॅसिव्ह ऑनलाईन कोर्स (श्ध्ध्ण्s) उपलब्ध करून देणार आहे.
2.मॅसिव्ह ऑनलाईन कोर्सच्या (श्ध्ध्ण्s)माध्यमातून जागतिक दर्जाचे शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी शैक्षणिक तज्ञ, चित्रपट दिग्दर्शक, अ??निमेटर्स आणि कॅमेरामन यांना एकाच मंचावर आणले जाईल.
3. मॅसिव्ह ऑनलाईन कोर्स स्वयंम या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले जातील.
सीईसी सोबत करार
सीईसी ही दिल्ली येथील संस्था असून तिचे संचालक जगतभूषण नड्डा यावेळी म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणात डिजिटल तंत्रज्ञानाला महत्त्व असून या धोरणाची अमंलबजावणी सीईसी या संस्थेच्या माध्यमातून होते. सीईसी ही संस्था ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून देते. ज्यामुळे या देशातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
मांडवी या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उच्च शिक्षण संचालनालयाने सीईसी (ण्दहेदूग्ल्स् दि dिंल्म्atग्दहत् ण्दस्स्ल्हग्म् सोबत करार केला. या करारातंर्गत संगीत आणि विश्ल?षणात्मक रसायनशास्त्र हे दोन कोर्स सीईसीला सुपुर्द करण्यात आले.
गोव्याने समाजाच्या मोठय़ा वर्गापर्यंत शिक्षण घेऊन जाण्यासाठी मोठे पाऊल उचललेले आहे. मांडवी या उपक्रमाचा फायदा केवळ गोव्यातील विद्यार्थ्यांनाच नव्हे तर देशभरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही चांगली संधी आहे.
रवी धवन, सचिव, शिक्षण खाते.
उच्च शिक्षण संचालनालय मांडवी या उपक्रमाद्वारे शिक्षकांना योग्य प्रशिक्षणाद्वारे ऑनलाईन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्रशिक्षित करेल. उच्च शिक्षण संचालनालय वर्षाच्या अखेरीस पाच अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे.
प्रसाद लोलयेकर, संचालक,