ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेले काही दिवस हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.
गेले काही दिवस कर्नाटकसह सह देशभरात वादाचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे हिजाबबंदी यावरुन कर्नाटक राज्यातील अनेक महाविद्यालयात वाद झाले होते. याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आज निर्णय दिला असुन या निकालात शैक्षणिक संस्थेत हिजाबबंदी योग्य असल्याचं म्हटलं आहे.
या निर्णयापूर्वी बेंगळुरूमध्ये २१ मार्चपर्यंत सर्व प्रकारचे मेळावे, आंदोलनं, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने किंवा उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. तर कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…