सलग तिसऱया वषी सहलींना ब्रेक : शैक्षणिक सहलीतून मिळणाऱया अधिक उत्पन्नापासून परिवहन महामंडळ वंचित
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन अडीच वर्षांत कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. तसेच शिक्षण खात्याने सलग तिसऱया वषीही शैक्षणिक सहलींवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शैक्षणिक सहलीतून मिळणाऱया उत्पन्नापासून परिवहनला वंचित व्हावे लागले.
दरवषी डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यादरम्यान शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक आणि वैज्ञानिक माहिती या सहलींच्या माध्यमातून दिली जाते. दरम्यान या सहलींसाठी परिवहन मंडळाच्या बसना पसंती दिली जाते. त्यामुळे परिवहनला चांगला महसूल प्राप्त होतो. मात्र गेल्या तीन वर्षांत शैक्षणिक सहली थांबल्या, त्यामुळे सहलींसाठी धावणाऱया बसही थांबल्या.
प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शैक्षणिक सहलींसाठी परिवहनची बस आरक्षित केली जाते. मात्र यंदा सहलीच रद्द झाल्याने परिवहनला फटका बसला आहे. शैक्षणिक सहलीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिवहन बसला पसंती दिली जाते. सहलीच्या हंगामामध्ये दररोज अनेक बस विविध ठिकाणी धावतात. मात्र कोरोनामुळे सहलींना ब्रेक लागला आहे. त्यामुळे यंदा देखील परिवहनला उत्पन्नापासून दूर रहावे लागणार आहे. विशेषतः सरकारी शाळांच्या सहलीसाठी परिवहनची बस आरक्षित केली जाते. मात्र सहलीवरच निर्बंध आल्याने यंदा एकही बस शैक्षणिक सहलीसाठी धावली नाही.
कोरोना आधी सहलीच्या हंगामादरम्यान परिवहनच्या दररोज 10 ते 15 बस विविध ठिकाणी भेटी देत होत्या. त्यामुळे परिवहनला चांगला महसूल मिळायचा. जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान परिवहनला शैक्षणिक सहलीतून चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून सहली थांबल्याने ते उत्पन्नही थांबले आहे.