गेल्यावर्षापासून शाळा-कॉलेज बंद असल्याने शैक्षणिक साहित्य-गणवेशाची खरेदी नाहीच : व्यावसायिकांना मोठा फटका
प्रतिनिधी /बेळगाव
उन्हाळी सुटी संपताच विद्यार्थी आणि पालकांना वेध लागतात ते शैक्षणिक साहित्य आणि गणवेश खरेदीचे. मात्र गेल्यावर्षापासून शाळा-कॉलेज बंद असल्याने शैक्षणिक साहित्याची आणि गणवेशाची खरेदी झाली नसल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेचे संक्रमण सुरू आहे. त्यामुळे शाळा- महाविद्यालये लवकर सुरू होण्याची शाश्वती नसून विपेत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
जून महिना उजाडताच शाळा सुरू होण्याची चाहूल लागते. उन्हाळी सुटी संपत आलेली असते. एका मोठय़ा विश्रांतीनंतर शाळेला जाण्याची विद्यार्थ्यांची धांदल असते. मात्र गेल्यावर्षापासून विद्यार्थ्यांची शाळा बंद असल्याने शैक्षणिक साहित्य, शूज, गणवेश खरेदी झाली नाही. त्यामुळे बुकस्टॉल, गणवेश तयार करणाऱया व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला
आहे.
शहरात अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. त्यात प्राथमिक आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळा गणवेश असतो. तसेच प्रत्येक महाविद्यालयाचाही वेगवेगळा गणवेश पाहायला मिळतो. मात्र यंदा विद्यार्थी घरीच असल्याने या व्यवसायावर पाणी फिरले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा विचार करून शाळा बंद करण्यात आल्या. यावेळी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. त्यामुळे एरव्ही एका विषयाला लागणाऱया दोन वहय़ांची जागा रफबुकने घेतली. त्यामुळे वहय़ांचा खपदेखील कमी झाला आहे. याचबरोबर पेन्सिल, रबर, शार्पनर, कंपास बॉक्स, पेन, रंगपेठी यांचीही खरेदी न झाल्याने स्टेशनरी व्यावसायिकांना समस्या निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे
शाळा सुरू झाल्यानंतर व्यापार नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांचे लसीकरण होऊन शाळा लवकरात लवकर सुरू होण्याबरोबरच कोरोनाचे संकटही टळू दे, अशी इच्छा काही विपेत्यांनी व्यक्त केली. तर काही विपेत्यांनी आमच्या व्यवसायापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याचे यावेळी
सांगितले.
गेल्यावषी महाविद्यालय गणवेशांच्या विक्रीतून झाला किरकोळ व्यापार
शाळा बंद असल्याने गणवेशाच्या ऑर्डरी मिळणे बंद झाल्या आहेत. बेळगावमधील जवळपास 30 ते 40 शाळांचे गणवेश आमच्या दुकानात उपलब्ध असतात. मात्र सध्या शाळा सुरू नसल्याने व्यवसायाला फटका बसला आहे. गेल्यावषी महाविद्यालये सुरू असल्याने थोडय़ा प्रमाणात गणवेशाची विक्री झाली. मात्र यंदा शाळा सुरू झाल्या नाही तर आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असल्याने यावर्षीदेखील शाळा सुरू होतील की नाही याची शंका आहे.
-पोपटलाल पोरवाल-गणवेश विक्रते
मालाचे पैसे देताना होतेय आर्थिक ओढाताण
गेल्यावषी लॉकडाऊनच्या आधी सर्व शाळांनी गणवेशाच्या ऑर्डरी दिल्या होत्या. मात्र लॉकडाऊन झाल्याने आणि शाळा बंद असल्याने सर्व तयार गणवेश धूळखात पडले आहेत. तसेच दरवषी शाळांचे गणवेश बदलत असल्याने आता तयार गणवेशांचे करायचे काय? हा प्रश्न पडला आहे. त्यात 10 टक्क्मयांनी गणवेशाचे दर वाढले आहेत. त्यामुळे साठवलेल्या मालाचे पैसे देण्यास आमची आर्थिक ओढाताण होत आहे. तसेच यावर्षीही शाळा सुरू नसल्याने समस्या निर्माण झाली आहे.
-प्रशांत कुंटे-गणवेश विक्रते
पाठय़पुस्तके-वहय़ांच्या विक्रीतील 40 टक्के महसूल बुडाला
गेल्यावषीपासून शाळा बंद असल्याने नोटबुक आणि टेक्स्ट बुक विक्रीचा व्यापार कमी झाला आहे. तसेच यावर्षीदेखील परिस्थिती जैसे थे असल्याने समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन माध्यमातून घेतला जात आहे. त्यामुळे थोडय़ा प्रमाणात का होईना वहय़ांची विक्री होत आहे. शैक्षणिक वर्ष बंद असल्याने गेल्यावषी 40 टक्के नुकसान झाले. मात्र ऑफिस वर्क, बँक, सरकारी कार्यालय या ठिकाणी फाईल, पेपर आणि स्टेशनरी साहित्य लागत असल्याने थोडाफार व्यवसाय होत आहे. गेल्यावर्षापासून आमचा निम्माच व्यापार होत आहे. तसेच शाळा-कॉलेज सुरू झाल्यास वहय़ा-पुस्तकांना मागणी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
-आशिष सावंत-शैक्षणिक साहित्य विक्रते